गुरु मंत्र
मन आणि यशप्राप्ती
- आपल्या विचारशैलीचा आपल्या व्यक्तिमत्वावर आणि कामगिरीवर सखोल परिणाम होत असतो.
- सकारात्मक विचार आपल्या जागृत आणि सुप्त मनात सतत येत राहायला हवेत.
- आत्मविश्वासामुळे आपली कामगिरी सुधारते, कामाची गुणवत्ता वाढते.
- आपल्या वागण्याची आणि आपण करीत असलेल्या कामाची जबाबदारी फक्त आपलीच असते.
- स्वयंशिस्त अंगी बाणवणे गरजेचे असते.
- ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी वृत्ती ठेऊन कधीच यश मिळत नसते.
आत्मनिष्ठा – चला जग जिंकूया!
- सकारात्मक आत्मप्रतिष्ठा यशासाठी आवश्यक आहे.
- स्वाभिमान हा यश किंवा अपयश निश्चित करणारा महत्वाचा घटक असतो.
- स्वाभिमानी असणं म्हणजे अहंकारी असणं नाही.
- आपल्यात अनेक गुण आहेत. त्यांचा शोध घेतला पाहिजे.
- कोणताही माणूस परिपूर्ण नाही. म्हणूनच, स्वत:च्या गुणदोषांचा डोळसपणे स्वीकार करा.
- गुणांबद्दल आदर असावा, अभिमान असावा, पण नसलेल्या गुणांची फुशारकी मात्र मारू नये.
सवयी
- योग्य विचार कृतीत उतरतात, कृतीद्वारे योग्य सवयी जडतात आणि योग्य सवयीतून आपले चारित्र्य ठरते.
- चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, पण त्यामुळे जीवनाला वेगळा अर्थ मिळतो.
- स्वयंशिस्तीनं आपण आपल्या सवयी आणि विचारांवर ताबा ठेवू शकतो.
- वाईट सवयी बदलण्यापेक्षा त्या लागूच नयेत याची काळजी घ्यायला हवी.
- स्वयंसूचना सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. मात्र वाईट सवयी घालविण्यासाठी अथवा बदलण्यासाठी स्वयंसूचना या सकारात्मक असाव्या लागतात.
प्रेरणा उर्जा
- ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतांना गरज असते प्रेरणेची.
- भय प्रेरणेचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.
- उत्तेजन किंवा प्रोत्साहन जोरदार असेल तर त्याचा चांगला उपयोग होतो.
- ध्येय साकार झाल्यावर मिळणाऱ्या यशापेक्षा कामाच्या पूर्ततेचे समाधान जास्त महत्वाचे असते.
- कार्यप्रवणतले विरोध करणारे घटक दूर केले की, प्रेरणा चेतविली जाते.
- बाह्य प्रेरणेपेक्षा अंत:प्रेरणा खरी आणि कायमस्वरूपी टिकणारी असते.
- आत्मसंतुष्टता हा प्रेरणेचा सर्वात मोठा शत्रू आहे.
ध्येयावर लक्ष
- आपल्या आयुष्यात ध्येय हवे.
- आपल्या स्वप्नांना कृतीची साथ मिळाली तरच ती सत्यात उतरतील.
- आपली ध्येयं अवघड असली तरी अशक्य नसावीत.
- ध्येयं ठरविताना ती स्मार्ट (smart) असावीत, ही काळजी घ्यावी.
- स्वानुभवावर आधारीत ध्येयामध्ये बदल करावा.
- आपले ध्येय सत्यात उतरविण्यासाठी नुसती इच्छा नाही तर ध्यास महत्वाचा असतो.
- ध्येय सत्यात उतरविताना अतोनात कष्ट घ्यायची तयारी ठेवावी.
विजयी भव!
- नशिबाला दोष देऊन तुमचे प्रश्न सुटणार नाहीत.
- माघार घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर त्यांना थेटपणे भिडून त्यांची उकल केल्यावर सुटतात.
- अपयशाचा विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा.
- अपयश का आले याची करणे देण्यापेक्षा केलेल्या कामाचे ठोस परिणाम दाखवावेत.
- संधीचे सोने करतांना प्रयत्न हवेत. प्रयत्नात सातत्य हवे, कसूर नको.
- आयुष्यात प्राधान्यक्रम महत्वाचा असतो.
- यशासाठी डोळस धोका पत्करावा लागतो.
- योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला तर संधीचा फायदा मिळतो.
- जो कल करे सो आज कर, आज करे सो अब, हा दृष्टीकोन ठेऊन प्रयत्न करायला हवेत.
- आपले ९९ टक्के प्रयत्न आपले एक टक्का नशीब बदलायला पुरेसे असतात.
- प्रवृत्त व्यक्ती ही स्वतःच्या व्यक्तीमत्वावरील अवगुणांवर गुणांनी मात करीत असते.
- खऱ्या हास्याच्या मदतीने आपल्यात नवा उत्साह येतो. हा उत्साहच आपल्याला आत्मविश्वास देतो.
- उत्साह हा संसर्गजन्य आहे.
- उत्साह आणि इच्छाशक्तीमुळे सामान्याचे असमान्यात रुपांतर होते.
जबाबदार बनूया!
- जबाबदारी न घेताच यशाची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
- जबाबदारीमुळे व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडून येतात.
- हास्य आणि दयाभाव यामुळे नात्यांमध्ये आपलेपणा निर्माण होतो.
- आपल्यात असणार्या अवगुणांबाबत लाज न बाळगता त्यावर कशी मात करता येईल याचा विचार करावा.
- विनोदबुद्धीचा उपयोग करून भोवतालचे वातावरण तणावरहित करण्याचा प्रयत्न करावा. मात्र तो विनोद इतरांची टर उडविणारा नसावा.
- स्नेहसंबंध जुळून येतात ते प्रामाणिकपणा, त्याग आणि सचोटीच्या पायावर.
- संकटातही जो आपली साथ सोडत नाही, तोच खरा मित्र.
- योग्य मार्गदर्शक गुरूमुळे आयुष्यात चांगले-वाईट, खरे-खोटे यातील फरक समजून घेता येतो.
- नातेसंबंधांमध्ये परिपूर्णतेपेक्षा जसे आहे तसे स्वीकारण्याची वृत्ती असावी.
नेटर्किंग
- यशासाठी ‘ओन्ली मी’ (Only Me) पेक्षा ‘टीमवर्क’ (Team Work)ची गरज अधिक असते.
- ‘टीमवर्क’ (Team Work) साठी संवाद महत्वाचा असतो.
- मनात येईल ते बोलण्यापेक्षा विचारपूर्वक बोला.
- टीका करतांना ती खाजगीत करावी.
- चांगला वक्ता होण्यापेक्षा चांगला श्रोता होणे जास्त कठीण असते.
- मनापासून केलेले कौतुक अनेकदा सुसंवादाकडे घेऊन जाणारी कृती ठरते.
- योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य शब्दांत केलेली प्रशंसा समोरच्या व्यक्तीला अधिक सुखावणारी असते.
- एखाद्या मुद्द्यावर चर्चा अवश्य करावी, वाद मात्र टाळावा.
- कुचाळक्या करणे, अफवा पसरवणे आणि त्या टाळणे अधिक श्रेयस्कर असते.
- आपल्याजवळ असणाऱ्या योग्य किंवा चांगल्या गोष्टींबद्दल नेहमीच कृतज्ञ असावे.
- आपले आयुष्य हे प्रतिध्वनीसारखे आहे; आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते.
स्नेहसंबंध!
- इतरांची वागणूक ही आपल्या वागणुकीची प्रतिक्रिया असते.
- ज्या रंगांच्या चष्म्यातून आपण जगाकडे पाहतो, त्याच रंगाची माणसं आपल्याला दिसतात.
- नाती ही विश्वासावर उभी असतात.
- आपल्याला नातेसंबंध टिकवायचे असतील तर अहंकार बाजूला सारला पाहिजे.
- आपल्यात असणारे दोष नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम करतात.
- मत्सर माणसाला नीतीभ्रष्ट करतो. वर चढणाऱ्याचे पाय खाली खेचण्यातच अशा वेळी धन्यता वाटते.
- व्यक्तीला टिकेचा विषय बनविण्यापेक्षा त्याच्या चुकीच्या वर्तनावर टीका करावी.
- विधायक किंवा सकारात्मक टीका ही प्रेरणा देणारी, मार्गदर्शक बनणारी असू शकते.
- टीका ही यशस्वी लोकांवरच होते.
- विधायक टीका स्वीकारता न येणे हे कमकुवत आत्मप्रतिष्ठेचे लक्षण आहे.
- टिकेप्रमाणेच योग्य पद्धतीने केलेली तक्रारही स्वतःत बदल घडवून आणायला मदत करते.
- मोकळ्या मनाने परिस्थितीला सामोरे जा, रिकाम्या मनाने नाही.
गुढी उभारू मुल्यांची!
- वाईट किंवा विकृत जीवनमूल्यांमुळे दुःखच वाट्याला येते.
- आपली जीवनमूल्ये जर निश्चित आणि सुस्पष्ट असतील तर निर्णय घेणे सोपे जाते.
- मूल्ये आणि नैतिकतेमुळे वाईट काळातही आपला बचाव होतो.
- सोईस्कर नैतिकता म्हणजे खरी नैतिकता नव्हे.
- नीतीमुल्य आणि नैतिकता म्हणजे समानता आणि न्यायपूर्ण वागणूक होय.
सुजाण पालक होतांना
- आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळेच आपण जीवनात यशस्वी होणार की अयशस्वी होणार, हे ठरत असते.
- लहानपणी आपले पालक, शिक्षक, गुरु हेच आपले आदर्श असतात.
- आपल्याबाबत व्यक्त होणाऱ्या बऱ्या-वाईट प्रतिक्रियांवर आपली प्रतिमा बनत असते.
- आदर्श पाल्य घडविण्यासाठी आधी पालकांनी आदर्श पालक बनायला हवं.
- सतत टीका, तुलना या गोष्टी पालकांनी टाळायला हव्यात.
- सुसंस्कृत व्यक्तिमत्व विकासासाठी शिस्त आवश्यक असते.